दिल्लीमध्ये ३ टप्प्यात सुरु होणार मेट्रो सेवा, काही स्थानके राहणार बंद

निवेदनात म्हटले आहे की गाड्या सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत धावतील. ९ सप्टेंबर रोजी ब्लू लाइन आणि पिंक लाइनवर पुन्हा सेवा सुरू होईल. १० सप्टेंबरपासून रेड लाइन, ग्रीन लाइन, व्हायलेट लाइनवर सेवा सुरू होईल.

दिल्ली : दिल्ली मेट्रो सेवा ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान तीन टप्प्यात सरु केली जाईल, परंतु काही स्थानके बंद राहतील. डीएमआरसीने ही माहिती दिली. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली मेट्रो सेवा ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान तीन टप्प्यात टप्प्याटप्प्याने सुरु केली जाईल, दिल्लीच्या समयपूर बादलीच्या हुडा सिटी सेंटरला जोडणारी यलो लाइन आणि रॅपिड मेट्रो प्रथम ७ सप्टेंबरपासून सुरू होईल.

केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी बुधवारी सांगितले की, महाराष्ट्र वगळता देशभरात मेट्रो ट्रेन सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यात येईल आणि प्रवाशांना कोविड -१९ च्या विरोधात सर्व खबरदारी घ्यावी लागेल. डीएमआरसीचे प्रमुख मंगू सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ज्या स्थानकांवर सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून प्रवासी आढळणार नाहीत अशा स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत.