Microsoft ची मोठी घोषणा; बंद होणार Windows 10, जाणून घ्या काय आहे कारण ?

ज्यावेळी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 (Windows 10) लाँच केलं, त्यावेळी त्यांनी हे विंडोजचं शेवटचं वर्जन असल्याचं सांगितलं होतं. परंतु कंपनीच्या लेटेस्ट टीजरने या महिन्याच्या अखेरपर्यंत Windows 11 लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे. 

    नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एक मोठी घोषणा केली आहे. 2025 मध्ये Windows 10 बंद करण्यात येण्याचं कंपनीने सांगितलं आहे. कंपनीने अपडेटेड Windows लाइफ सायकल फेस शीटमध्ये सांगितलं, की 14 ऑक्टोबर 2025 रोजी Windows 10 Home, Pro, Pro for Workstations, आणि Pro Education बंद केलं जाईल. म्हणजेच अमेरिका स्थित टेक कंपनी या तारखेपासून कोणतंही अपडेट आणि सिक्योरिटी फीचर जारी करणार नाही.

    ज्यावेळी मायक्रोसॉफ्टने विंडोज 10 (Windows 10) लाँच केलं, त्यावेळी त्यांनी हे विंडोजचं शेवटचं वर्जन असल्याचं सांगितलं होतं. परंतु कंपनीच्या लेटेस्ट टीजरने या महिन्याच्या अखेरपर्यंत Windows 11 लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे.

    कंपनीने आपल्या वेबसाईटवर एक नवा इव्हेंट लिस्ट केला आहे, जो 24 जून रोजी होणार आहे. इव्हेंटमध्ये कंपनी ‘नेक्स्ट फॉर विंडोज’ येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हायलाईट करेल. मायक्रोसॉफ्टने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे.