त्यांनी २५१ रुपयांमध्ये मोबाईल विकण्याच्या बहाण्याने केली फसवणूक, ४ बनावट कंपन्यांद्वारे ड्रायफ्रूटचाही गोरखधंदा

ड्राय फ्रूट्स खरेदी(dry fruit fraud) करून देशभरातील एक हजारापेक्षा अधिक लोकांकडून २०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक करणारे दुबई ड्राय फ्रूट्स कंपनीचे प्रमोटर मोहित गोयल आणि एमडी ओमप्रकाश जांगिड यांना नोएडा पोलिसांनी(noeda police) अटक केली आहे.

दिल्ली: ड्राय फ्रूट्स खरेदी(dry fruit fraud) करून देशभरातील एक हजारापेक्षा अधिक लोकांकडून २०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची फसवणूक करणारे दुबई ड्राय फ्रूट्स कंपनीचे प्रमोटर मोहित गोयल आणि एमडी ओमप्रकाश जांगिड यांना नोएडा पोलिसांनी अटक केली आहे. पूर्वी मोहित गोयल यांनी रिंगिंग बेल कंपनी बनवून२५१ रुपयात अँड्रॉईड मोबाईल विकण्याच्या नावावरही लोकांची फसवणूक केली आहे. यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. या आरोपीने नोएडा व गुरुग्राममध्ये ४ वेगवेगळ्या नावाने बनावट कंपनी बनवून विविध फर्ममधून ड्राय फ्रूट्सची खरेदी केली आणि त्यांचे पैसे दिले नाही.

१२ आरोपी फरार
या प्रकरणात आता १२ आरोपींचा समावेश असून ते फरार आहेत. हे लोक यावर्षी नोएडामध्ये कंपनी बनवून फसवणूक करीत आहेत. हे लोक यावर्षी नोएडामध्ये कंपनी बनवून फसवणूक करीत होते. यांच्याविरोधात कोतवाली सेक्टर-५८ मध्ये गुन्हा दाखल आहे. अप्पर पोलीस आयुक्त कायदा व्यवस्था लव कुमार यांनी सांगितले की, कोतवाली सेक्टर-५८ पोलिसांच्या टीमने रविवारी सायंकाळी सेक्टर-५० पासून मेघदूतम अपार्टमेंट निवासी मोहित गोयल आणि जयपूर निवासी ओमप्रकाश जांगिड यांना अटक केली.

उघडली बनावट कंपनी
या लोकांनी सेक्टर-६२ च्या कोरेंथम बिल्डिंगमध्ये दुबई ड्राय फ्रूट्स नावाने एक फर्जी कंपनी उघडली होती. ओमप्रकाश या कंपनीचे एमडी आणि मोहित याचे प्रमोटर होते. हे लोक देशभरातील विविध फर्मंमधून संपर्क करून त्यांच्याकडून ड्राय फ्रूट्स, डाळ, तेल, मसाले खरेदी करीत होते. फर्म संचालकांचा विश्वाय संपादन करण्यासाठी त्यांना काही रक्कम आधी देत होते. यानंतर त्यांच्याकडून लाखों रुपयाचे ड्राय फ्रूट्स किंवा इतर सामान घेऊन पैसे दिले नव्हते. पोलिस तपासणीत माहिती पडले की, आरोपींनी नोएडा व गुरुग्राममध्ये चार बनावट कंपन्या बनवून देशभरातून जवळपास एक हजारापेक्षा अधिक लोकांकडून २०० कोटींपेक्षा अधिकची फसवणूक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनुसार, ही फसवणूक जवळपास ५०० कोटी रुपयापर्यंतची होऊ शकते.

हे आहेत बदाम गँगचे आरोपी
या प्रकरणात पीडितांनी २० ऑक्टोबरला कोतवाली सेक्टर-५८ पोलिसांकडे तक्रार केली होती. तपासणीनंतर या प्रकरणात २४ डिसेंबरला पोलिसांनी गुन्हा नोंदविला. कोतवाली सेक्टर -५८ पोलिसांनी मोहित गोयल, सुमित यादव, मुसर्फिल लष्कर, विजय, नायरा सिंह उर्फ नील कमल, उज्जवल डे, स्वाति डे, सीए गौरव, राजीव कुमार, रुपेश कुमार ठाकुर, ओमप्रकाश जांगिड, एवीपी नायरा व स्वातीसह १४ लोकांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

२०१७पासून सुरू केली बनावट कंपनी
ही बनावट कंपनी २०१७ पासून सुरू झाली. मोहित गोयल हे बनावट कंपनीचे सूत्रधार आहेत. प्रत्येक कंपनीसोबत प्रोपरायटर व एमडीचा चेहरा बदलत होता. ऑफिसचे ठिकाणही बदलत होते. अप्पर पोलिस आयुक्त लव कुमार यांनी सांगितले की, २०१७मध्ये मोहित यांनी आपला मित्र मनोज कादियान यांच्यासोबत गुरुग्राममध्ये फॅमिली ऑफ ड्राय फ्रूट्सच्या नावाने कंपनी सुरू केली. कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर यांच्याविरोधात बरेलीमध्ये प्रकरणाची नोंद झाली आणि मनोज यांना अटक करण्यात आली.