Asuddin Owaisi

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अलकायदासारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या काही भागात सक्रिय झाल्या आहेत. आयएसआय अगोदरपासूनच भारताचा शत्रू आहे. आपल्याला लक्षात ठेवायला हवे की आयएसआयच तालिबानला कंट्रोल करतो आणि तालिबना त्याच्या हातातील खेळणे असल्याचेही ओवैसी म्हणाले.

    दिल्ली : अफगणिस्तानवर तालिबाने कब्जा केल्यानंतर तेथील महिलांवर ताबिलाबान्यांकडून होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. भारतातूनही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर टीकेचा बाण सोडला आहे.

    असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे की, एका अहवालानुसार भारतात नऊपैकी एका मुलीचा मृत्यू हा ती पाच वर्षांची होण्याअगोदर होतो. इथे महिलांवर अत्याचार व त्यांच्याविरोधातील गुन्हे घडत आहेत. मात्र त्यांना अफगाणिस्तानमध्ये महिलांसोबत काय घडत आहे, याची चिंता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्याने सर्वाधिक फायदा पाकिस्तानला झाला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अलकायदासारख्या दहशतवादी संघटना पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या काही भागात सक्रिय झाल्या आहेत. आयएसआय अगोदरपासूनच भारताचा शत्रू आहे. आपल्याला लक्षात ठेवायला हवे की आयएसआयच तालिबानला कंट्रोल करतो आणि तालिबना त्याच्या हातातील खेळणे असल्याचेही ओवैसी म्हणाले.

    ओवैसींनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला केंद्रीयमंत्री शोभा करंदलाजे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. असदुद्दीन ओवैसींना त्यांच्या महिला व समाजाच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानमध्ये पाठवलेले योग्य राहील, असे करंदलाजे यांनी म्हटले आहे.