मोदी सरकारने घेतला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय; ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ

एखाद्या शेतकऱ्याची वसुली 9.5 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला 275.50 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. या निर्णयानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर 87 टक्के परतावा मिळेल. यापूर्वी ऊसाची एफआरपी 285 रुपये प्रति क्विंटल होती. यावेळी क्विंटल मागे 5 रुपये वाढ करण्यात आली आहे.

    दिल्ली : केंद्र सरकारने री ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ऊसाच्या खरेदी दर वाढवून 290 रुपये प्रति क्विंटल केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत 10 टक्के साखरेच्या रिकव्हरीच्या आधारावर ऊसावरील एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    एखाद्या शेतकऱ्याची वसुली 9.5 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्याला 275.50 रुपये प्रति क्विंटल दर मिळेल. या निर्णयानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चावर 87 टक्के परतावा मिळेल. यापूर्वी ऊसाची एफआरपी 285 रुपये प्रति क्विंटल होती. यावेळी क्विंटल मागे 5 रुपये वाढ करण्यात आली आहे.

    दरवर्षी ऊसाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकार एफआरपी जाहीर करते. साखर कारखान्यांना ही एफआरपी ऊस उत्पादकांना द्यावी लागते. 2020-21 मध्ये ऊस उत्पादकांना 91000 कोटी रुपये देण्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी 86,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या योजनांमुळे आता ऊस उत्पादकांना पूर्वीप्रमाणे वर्षानुवर्षे त्यांच्या निधीसाठी संघर्ष करावा लागणार नाही.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]