कोरोना काळात नोकरी गेलेल्यांना मोदी सरकारचा दिलासा, मिळणार ३ महिन्यांची मदत

कोरोना काळात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना दिलासा देण्यासाठी सरकारने नियम शिथिल केले आहेत. नोकरी गमावलेल्या कामगारांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे याचा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्या नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना होणार आहे.

दिल्ली : देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते उद्योगधंदे  करणाऱ्या मालकांपर्यंत सर्वच घरी होते. त्यामुळे देशातील सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. तसेच सर्व बंद असल्यामुळे अनेक नागरिकांच्या नोकऱ्या झाल्या अनेक तरुण बेरोजगार झाले. याच पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगार नागरिकांचा विचार करत सरकारे मोठा निर्णय जाहीर करुन दिलासा दिला आहे. या कामगारांना तीन महिन्यांच्या सरासरीच्या ५० टक्के पगार देणार असल्याचे सांगितले आहे. हि रक्कम अनएम्पलॉमेंट बेनिफिटच्या स्वरुपात दिली जाणार आहे. तसेच या निर्णयामुले ४० लाख कामगारांना दिलासा मिळणार आहे. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोरोना काळात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना दिलासा देण्यासाठी सरकारने नियम शिथिल केले आहेत. नोकरी गमावलेल्या कामगारांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे याचा फायदा २४ मार्च ते ३१ डिसेंबर या कालावधीत ज्या नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांना होणार आहे. 

केंद्रिय सरकारने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.