मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय; राष्ट्रपतींनी ८ राज्यात नेमले नवे राज्यपाल

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असतानाच नुकतीच ८ राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असतानाच नुकतीच ८ राज्यांसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, गोवा, त्रिपुरा, झारखंड, हरियाणा आणि मिझोरम या राज्यांसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या राज्यपालांची नेमणूक केली आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलोत यांची कर्नाटकचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  नव्या राज्यपालांची यादी : 

  • कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मिझोरमचे राज्यपाल म्हणून हरी बाबू कंभपती यांची नियुक्ती
  • मंगुभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती
  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांची हरियाणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.