मोदी सरकारचा मोठा निर्णय; चीन सीमेला जोडणारे सर्व महामार्ग करणार रुंद

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य महामार्गांची रुंदी त्या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवरून ठरविण्यात येते. वाहनांची संख्या कमी असल्यास रस्त्याची रुंदी ५.५ मीटर केली जाते. याबद्दल २०१८ मध्ये एक ठराव पारित करण्यात आला होता, परंतु रक्षा मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला होता.

दिल्ली. भारत चीन सीमेला जोडले जाणारे सर्व राज्य महामार्गाची रुंदी वाढविण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे या सर्व महामार्गाची रुंदी १० होणार असल्याचे समजते. चीन सीमेला जोडणारे सर्व दुपदरी महामार्गाच्या बाबतीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने लेह-लद्दाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीमसहा अन्य पर्वतीय भागांचा समावेश असेल. सध्यस्थितीत सीमेला जोडल्या जाणाऱ्या राज्य महामार्गाची रुंदी ५०५ मी. इतकी आहे.

राज्य रस्ते व परिवहन मंत्रालयाने मंगळवारी पर्वतीय क्षेत्रांबद्दल विशेषतः चीन सीमेला जोडल्या जाणाऱ्या दुपदरी महामार्गाबद्दलचे निकष बदलले आहे. बीआरओ, एनएचएआई, एनएचएआईडीसी, पीडब्ल्यूडीच्या  वरिष्ठ अभियंत्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही याबद्दल सूचना पत्रक पाठविले आहे.

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्य महामार्गांची रुंदी त्या मार्गावरून होणाऱ्या वाहतुकीवरून ठरविण्यात येते. वाहनांची संख्या कमी असल्यास रस्त्याची रुंदी ५.५ मीटर केली जाते. याबद्दल २०१८ मध्ये एक ठराव पारित करण्यात आला होता, परंतु रक्षा मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते पर्वतीय क्षेत्रात कमी रुंदीच्या रस्त्यावर सेनेचे जड वाहन, रसद पुरविणारे वाहन व टॅंक यांची वाहतूक करण्यास अडचण येते. वळण मार्गावर या वाहनांचा वेग अत्यंत कमी करावा लागतो. म्हणूनच पर्वतीय क्षेत्रात विशेषतः चीन सीमेजवळ जाणाऱ्या  राज्य महामार्गाची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.