पंतप्रधान मोदींच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा; मोदींच्या जवळची तिसरी हायप्रोफाईल एक्झिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा यांनी दिलेल्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.

    दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिन्हा यांनी दिलेल्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.

    नृपेंद्र मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर 2019 पासून पी. के. सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागाराची जबाबदारी सांभाळत होते. कॅबिनेट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्यानंतर सिन्ह यांना पंतप्रधान मोदींनी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

    दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्यांशी संबंधित ही तिसरी हायप्रोफाईल एक्झिट आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख सचिव म्हणून जबाबदारी हाताळणाऱ्या नृपेंद्र मिश्रा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आपला राजीनामा सोपवला होता. त्यानंतर, जून महिन्यात पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीदेखील राजीनामा दिला होता.