मोदींची लाट ओसरली; निवडणुकीतील पराभवानंतर विदेशी माध्यमांचा पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका बसला असून तृणमूल काँग्रेसने २०० हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तसेच, केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये देखील भाजपला फारशी चमक दाखवता आलेली नाही. वॉशिंग्टन पोस्टने या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

    वॉशिंग्टन : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ज्यामध्ये भाजपला पश्चिम बंगालमध्ये मोठा झटका बसला असून तृणमूल काँग्रेसने २०० हून जास्त जागांवर विजय मिळवला आहे. तसेच, केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये देखील भाजपला फारशी चमक दाखवता आलेली नाही. वॉशिंग्टन पोस्टने या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

    कोरोनाचा सरवाधिक फटका बसलेला देश भारत ठरत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभा घेऊन चुकीचा संदेश दिला. त्यांच्यावर याबद्दल अनेक तज्ज्ञांनी टीका देखील केली आहे. पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा करावा लागलेला सामना हा या कोरोना काळात मोदींची लाट कमी झाल्याचेच सूचित करत असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाची कमजोर आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली असतानाच भारतात ४ राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशात निवडणुका घेण्यात आल्या. त्यावर बऱ्याच तज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. मद्रास उच्च न्यायालयाने देखील निवडणूक काळात झालेल्या रुग्णसंख्या विस्फोटाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याची टिप्पणी केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.