Mohit Goyal, mastermind of 'Freedom 251' scam, arrested for claiming to have made smartphones available for Rs 251

केवळ 251 रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या धोकेबाज कंपनीचा संचालक मोहीत गोयल याला पोलिसांनी अटक केली. 'फ्रीडम 251 ' या नावाने एक स्कीम बाजारात उतरवून अनेकांना गंडा घातल्यानंतर मोहीत चर्चेत आला होता.

    गाझियाबाद : केवळ 251 रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या ‘रिंगिंग बेल्स’ या धोकेबाज कंपनीचा संचालक मोहीत गोयल याला पोलिसांनी अटक केली. ‘फ्रीडम 251 ‘ या नावाने एक स्कीम बाजारात उतरवून अनेकांना गंडा घातल्यानंतर मोहीत चर्चेत आला होता. 200 कोटी रुपयांच्या सुक्या मेव्याच्या घोटाळ्यातही तो पोलिसांना हवा होता. मात्र, आणखी एका 41 लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणी पोलिसांनी मोहीतला ग्रेटर नोएडा भागातून अटक केली.

    मोहीत गोयल याला इंदिरापुरम पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केल;. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इंदिरापुरमचा रहिवासी असलेल्या विकास मित्तल याने मोहीतविरुद्ध इंदिरापुरम पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा प्रयत्न, 41 लाखांची खंडणी यांसहीत वेगवेगळ्या आठ कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात पोलिसांनी मोहीतविरुद्ध कारवाई करत त्याला अटक केली.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]