दोन आठवड्यांपासून मान्सून विश्रांतीवर; दिल्लीत गर्मीने तोडला 90 वर्षांचा रेकॉर्ड

राजधानी दिल्लीत तापमानाने गेल्या 90 वर्षांचा रेकॉर्ड तोडला. हवामान विभागाकडून दिल्लीत 'हिट वेव्ह'ची घोषणा करण्यात आली. एखाद्या शहरात पारा 40 डिग्रीपेक्षा अधिक असेल तेव्हा 'हिट वेव्ह'ची घोषणा करण्यात येते. गेल्या दोन दिवसांसाठी हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट'ही जारी करण्यात आला होता. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येतो. अशा वेळी नागरिकांना हिटस्ट्रोक, डायरिया आणि टायफाईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत जबरदस्त उन्हाच्या झळा बसत आहेत. दिल्लीच्या मंगेशपूरमध्ये 45.2 डिग्री, नजफगडमध्ये 44 डिग्री तर पीतमपुरा भागात 44.3 डिग्री अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

    दिल्ली : ठराविक वेळेपूर्वी भारतात दाखल झालेला मान्सून गेल्या दोन आठवड्यांपासून रूसल्याचे दिसून येत आहे. मान्सूनच्या विश्रांतीमुळे उत्तर भारतातील शहरांमध्ये पारा सरासरीपेक्षा 7 अंश जास्त आहे. दिल्लीत गुरुवारी पारा 44 अंश होता, जो या कालावधीत 37-38 अंश असतो. दिल्लीसह हरियाणा, पंजाब, चंदीगड व पश्चिम यूपीचा भाग तीन दिवसांपासून उष्णतेच्या तावडीत आहे. या भागात अजून मान्सूनचे आगमन झालेले नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या वाऱ्यांनी पश्चिम उत्तर प्रदेशातील आकाशात मान्सूनचे वारे दोन आठवड्यांपासून रोखून धरले आहेत. केरळमध्ये दोन दिवस उशिरा आलेला मान्सून इतक्या वेगाने पुढे सरकला की 10 दिवसांतच देशाच्या 80% भागात पोहोचला, मात्र आता थांबला आहे.

    दिल्लीत गर्मीने तोडला 90 वर्षांचा रेकॉर्ड

    राजधानी दिल्लीत तापमानाने गेल्या 90 वर्षांचा रेकॉर्ड तोडला. हवामान विभागाकडून दिल्लीत ‘हिट वेव्ह’ची घोषणा करण्यात आली. एखाद्या शहरात पारा 40 डिग्रीपेक्षा अधिक असेल तेव्हा ‘हिट वेव्ह’ची घोषणा करण्यात येते. गेल्या दोन दिवसांसाठी हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ही जारी करण्यात आला होता. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येतो. अशा वेळी नागरिकांना हिटस्ट्रोक, डायरिया आणि टायफाईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत जबरदस्त उन्हाच्या झळा बसत आहेत. दिल्लीच्या मंगेशपूरमध्ये 45.2 डिग्री, नजफगडमध्ये 44 डिग्री तर पीतमपुरा भागात 44.3 डिग्री अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

    रात्रीही उष्णतेचा सामना

    देशभरात मान्सूनचा हंगाम सुरू असतानाही उष्णतेने नागरिकांना भयभीत करून सोडले आहे. केवळ दुपारीच नाही तर रात्रीही भयंकर उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या दिवसांच्या रिपझिपसोबत नागरिकांना दिलासा मिळायला हवा होता. मात्र सध्या दिल्लीच्या आकाशात ढग आणि पावसाचा कुठेही पत्ता दिसत नाही आणि पारा 40 डिग्री अंश सेल्शिअसच्याही पुढे गेला आहे. 27 जून रोजी राजधानी दिल्लीचे तापमान 40 डिग्री अंश सेल्शिअस, 28 जूनला कमाल तापमान 41 डिग्री अंश सेल्शिअस, तर 29 जून 43 आणि 30 जून रोजी कमाल तापमान 43.5 डिग्री अंश सेल्शिअस होते. गुरुवारी 43.9 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद करण्यात आली.