16 पासून स्मारके, म्युझियम उघडणार; केंद्र सरकारची परवानगी

भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. गेल्या महिन्यात दिवसाला 4 लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळत होते. ती संख्या आता 70 हजारांपर्यंत खाली आली आहे. अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लादलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेली सर्व स्मारके, म्युझियम हे 16 जूनपासून उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जाता येणार आहे.

    दिल्ली : भारतातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. गेल्या महिन्यात दिवसाला 4 लाखापर्यंत नवीन रुग्ण आढळत होते. ती संख्या आता 70 हजारांपर्यंत खाली आली आहे. अनेक राज्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी लादलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. यातच आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असलेली सर्व स्मारके, म्युझियम हे 16 जूनपासून उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना या ठिकाणी जाता येणार आहे.

    कोरोनाच्या वाढत्या ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर स्मारके बंद करण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतीक राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल याबाबत म्हणाले की, पर्यटन मंत्रालयाने सर्व स्मारके 16 जून 201 पासून उघडण्यास परवानगी दिली आहे. पर्यटकांना कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करत पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

    पर्यटन मंत्रालयाच्या आदेशानुसार, पुरातत्व खात्याच्या अंतर्गत येणारी सर्व स्मारके आणि म्युझियम उघडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तसंच ही स्मारके, म्युझियम ज्या राज्यांमध्ये आहेत तिथल्या नियमावलीचे पालन करावे लागेल. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ताज महालसह सर्व स्मारके आणि म्युझियम बंद करण्यात आली होती. कोरोनामुळे पर्यटन क्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असलेल्यांना मोठा फटका बसला आहे.

    हे सुद्धा वाचा