आईने आज कोरोनाची लस टोचून घेतली, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती

पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या आईच्या अगोदर घेतलेली कोरोनाची लस हा मुद्दा समाजमाध्यमांत चांगलाच चर्चिला गेला. त्यावर अनेक व्यंगचित्रं आणि मीम्सदेखील प्रसिद्ध झाले. या सगळ्या चर्चांना आणि टिप्पण्यांना पूर्णविराम देत आपल्या आईनंदेखील लस टोचून घेतल्याची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलीय. आपल्या आईनं कोरोनाची लस घेतली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमातून जाहीर केलंय. 

    कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात सध्या ६० वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. त्याचप्रमाणे ४५ वर्षांच्या वरील गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनाही कोरोना लसीकरण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या टप्प्याच्या सुरुवातीलाच कोरोनाची लस घेतली होती. मात्र नोटाबंदीत आईला रांगेत उभे करणारे पंतप्रधान लस टोचून घेण्याच्या बाबतीत मात्र आईला मागे ठेऊन स्वतः लस टोचून घेतात, अशी टीका विरोधकांनी केली होती.

    पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या आईच्या अगोदर घेतलेली कोरोनाची लस हा मुद्दा समाजमाध्यमांत चांगलाच चर्चिला गेला. त्यावर अनेक व्यंगचित्रं आणि मीम्सदेखील प्रसिद्ध झाले. या सगळ्या चर्चांना आणि टिप्पण्यांना पूर्णविराम देत आपल्या आईनंदेखील लस टोचून घेतल्याची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलीय. आपल्या आईनं कोरोनाची लस घेतली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमातून जाहीर केलंय.

    आपल्या आजूबाजूला जे कुणी नागरिक ६० वर्षांवरील असतील त्यांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. त्याचप्रमाणं ४५ वर्षांवरील गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही लस टोचून घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. भारतात सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहिम वेगाने सुरू असून सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय.

    सरकारी दवाखान्यांमध्ये ही लस मोफत उपलब्ध असून खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये २५० रुपयांना कोरोनावरील लसीची डोस उपलब्ध होणार आहे. या लसीमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी कमी होत असल्याचं सिद्ध झालंय. मात्र लस घेतल्यानंतरही माास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग राखणे गरजेचे आहे.