केंद्र सरकारच्या राजभाषा समितीच्या कार्यकारी संयोजक पदी खासदार श्रीरंग बारणे

राजभाषा समितीच्या माध्यमातून हिंदी भाषेसाठी चांगले कार्य करता येते. केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांचा अभ्यास केला जातो. हिंदीचा प्रसार करणे या समितीचा मूळ उद्देश आहे. केंद्र सरकारच्या ज्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर केला जात नाही, त्यांना प्रमाणात हिंदी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते.

पिंपरी: केंद्रीय राजभाषा समितीच्या (Language Committee of the Central Government) कार्यकारी संयोजकपदी मावळचे शिवसेना खासदार ‘महासंसदरत्न’ श्रीरंग बारणे (Shrirang Barane)यांची नियुक्ती झाली आहे. ही मावळ लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे.

राजभाषा समिती १९७६ साली अस्तित्वात आली आहे. या समितीत ३० सदस्य असतात. लोकसभेतील २० आणि राज्यसभेतील दहा सदस्य असतात. या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री अमित शहा आहेत. ही समिती देशभरातील केंद्रीय कार्यालयांमध्ये हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम करते. त्याचा आढावा घेते. खासदार बारणे यांनी मागील पाच वर्ष या समितीत सदस्य म्हणून काम केले आहे. वरिष्ठ सदस्य म्हणून खासदार बारणे यांची समितीच्या संयोजकपदी नियुक्ती झाली आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ”राजभाषा समितीच्या माध्यमातून हिंदी(Hindi ) भाषेसाठी चांगले कार्य करता येते. केंद्र सरकारच्या अनेक कार्यालयांचा अभ्यास केला जातो. हिंदीचा प्रसार करणे या समितीचा मूळ उद्देश आहे. केंद्र सरकारच्या ज्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर केला जात नाही. त्यांना प्रमाणात हिंदी भाषेचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते . १९७६ साली ही समिती अस्तित्वात आली आहे. ही एकमेव अशी समिती आहे की त्याचा अहवाल लोकसभेत सादर केला जात नाही. थेट देशाच्या राष्ट्रपतींना सादर केला जातो. संसदेतील ही एक सक्षम समिती आहे”.