मुस्लिम तरुणीशी विवाह केलेल्या तरुणाची हत्या

सहा महिन्यापूर्वी शहनाज नावाच्या मुस्लिम मुलीसोबत त्याने लग्न केले होते. मात्र लग्न केल्याचे कोणतेही कागदपत्रे आढळून आली नाहीत. पोलिस प्रत्येक बाबीवरून या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिल्ली: नोएडात मुस्लिम मुलीशी विवाह केलेल्या राधे चौहान या युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे समोर आले आहे. राधेचा मृतदेह बोटॅनिकल गार्डन मेट्रो स्थानकाजवळ शौचालयात आढळून आला आहे. मृत तरुणाने सहा महिन्यापूर्वी एका मुस्लिम तरुणींनी सोबत विवाह केला होता. हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. घटनासथळावरून पोलिसांनी दोन वेगवेगळे चाकू हस्तगत केले आहेत. मृत राधेला अंमलीपदार्थाचे व्यसन असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

सहा महिन्यापूर्वी शहनाज नावाच्या मुस्लिम मुलीसोबत त्याने लग्न केले होते. मात्र लग्न केल्याचे कोणतेही कागदपत्रे आढळून आली नाहीत. पोलिस प्रत्येक बाबीवरून या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी मृताने स्वत: ला आग लावून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कुटुंबियांनी सांगितले. सुमारे दोन महिने तो घराबाहेर होता. तो पदपथावर झोपायचा. त्याचे कुटुंब सध्या बदलापुरात वास्तव्यास आहे.