शेतकरी आंदोलकांच्या ‘मानवी साखळीत’ मुस्लिम बांधवानी केली ‘नमाज अदा’

आंदोलनात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी आंदोलन स्थळवरच ' नमाज' अदा केली. त्यावेळी असताना शीख बांधवांनी स्वयंम स्फूर्तीने एकत्रित येऊन त्यांच्या नमाजमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये मानवी साखळी तयार केली

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी कायदयांच्या विरोधात दिल्ली हरियाणाला जोडणाऱ्या सिंघूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला जगभरातून सर्व जाती-धर्म व समुदायाच्या लोकांचा मोठ्याप्रमाणात पाठिंबा मिळत आहे. मागील १२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात सातत्याने एकात्मतेची भावना जोपासली जातअसल्याचे दिसून येत आहेत. नुकतेच आंदोलनात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांनी आंदोलन स्थळवरच ‘ नमाज’ अदा केली. त्यावेळी असताना शीख बांधवांनी स्वयंम स्फूर्तीने एकत्रित येऊन त्यांच्या नमाजमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये मानवी साखळी तयार केली होती. गुजरात फाईल पुस्तकाच्या लेखिका राणा आयुब यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडीओ अल्पावधीतच व्हायरल झाला झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक करत भारतातील खऱ्या अर्थाने सर्वधर्म सहिष्णूता असल्याचे म्हटले आहे.

.