मुथूट फायनान्सचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचं निधन

जॉर्ज मुथूट हे ७२ वर्षांचे होते. मुथूट फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी गैर-वित्तीय संस्था आहे. तसेच मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे ते तिसऱ्या पिढिचे अध्यक्ष होते. त्यांचं निधन नवी दिल्लीतील निवासस्थानी झाल्याची माहिती मुथूट यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. मुथूट यांच्या कुटूंबात पत्नी सारा आणि दोन मुले आहेत.

    नवी दिल्ली : मुथूट फायनान्सचे अध्यक्ष एमजी जॉर्ज मुथूट यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. जॉर्ज मुथूट हे ७२ वर्षांचे होते. मुथूट फायनान्स ही भारतातील सर्वात मोठी गैर-वित्तीय संस्था आहे. तसेच मुथूट समूहाचे अध्यक्षपद भूषवणारे ते तिसऱ्या पिढिचे अध्यक्ष होते. त्यांचं निधन नवी दिल्लीतील निवासस्थानी झाल्याची माहिती मुथूट यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिली. मुथूट यांच्या कुटूंबात पत्नी सारा आणि दोन मुले आहेत.

    २० पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये व्यवसायाचा समावेश

    मुथूट यांचा व्यवसाय २० पेक्षा अधिक क्षेत्रांमध्ये सुरू आहे. या व्यवसाय समुहाचे मुख्यालय कोचीमधील केरळ येथे आहे. मुथूट यांचा व्यवसाय सोने, बाँड्स, रिअल इस्टेट आणि रूग्णालय, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये समावेश आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षीच मोठी झेप घेत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून धुरा हाती घेतली होती. तसेच १९९३ मध्ये त्यांनी मुथूट समूहाचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं. गेल्याच वर्षी फोर्ब्ज मालिकातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांनी स्थान मिळवले होते.