ओ गुरू ठोको ताली, नवज्योत सिंग सिद्धूंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींना मोठा झटका

नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu Resigns) यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. सिद्धूंनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे सोनिया गांधींना सुद्धा हा मोठा झटका बसल्याचं सांगितलं जात आहे.

    पंजाब : पंजाबमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. परंतु अमरिंदर सिंह (Navjot Singh Sidhu Resigns) यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नवज्योत यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला मोठा आणि दुसरा झटका बसला आहे.

    नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे. सिद्धूंनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे सोनिया गांधींना सुद्धा हा मोठा झटका बसल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धू यांनी त्यांचा राजीनामा थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे पंजाब (punjab congress) काँग्रेसमधील नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.