NEET-PG परीक्षा लांबणीवर तर मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी

देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता NEET-PG परीक्षा चार महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता NEET-PG परीक्षा चार महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह मेडिकलच्या विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    कोरोना विषाणू संसर्गामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा देशातील ६,१०२ सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी आयोजित केली जाते. केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध व्हावेत म्हणून परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत.
    देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

    एमएमबीएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारे आरोग्य विषयक कन्सलटेशन करणे. सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेणं. प्राध्यापकांच्या निगराणीखाली त्यांनी ही कामं करायची आहेत. बीएसी आणि जीएनम पात्र असणाऱ्या नर्सेसना पूर्ण वेळ कोविड ड्यूटी करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
    कोरोना काळात जे वैद्यकीय कर्मचारी १०० दिवसांची सेवा पूर्ण करतील. त्या कर्मचाऱ्यांना पंतप्रधान कोरोना राष्ट्रीय सेवा सम्मानानं गौरवण्यात येणार आहे.