12 सप्टेंबर होणार NEET; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

मंगळवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून या परीक्षेसाठी अर्ज उपलब्ध असणार आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी ही परीक्षा असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणसाठी ही परीक्षा पास होणे महत्त्वाचे आहे.

    दिल्ली : 12 सप्टेंबर 2021 रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (नीट) घेतली जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली आहे. नीट परीक्षांबाबत गेल्या काही दिवसांपासून मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विद्यार्थी याबाबत विचारत होते. अखेर त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

    मंगळवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून या परीक्षेसाठी अर्ज उपलब्ध असणार आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी ही परीक्षा असल्याचे सांगण्यात आले होते. पण त्यासाठी आवश्यक असणारी प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षाही कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणसाठी ही परीक्षा पास होणे महत्त्वाचे आहे.

    नीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक विभागात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या वाढेल. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न निवड करता येतील. माहितीपत्रक आल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरवर्षी या परीक्षेला किमान 14 लाख विद्यार्थी बसतात. पण ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी करत होते.