अन्यायासमोर कधीही झुकणार नाही, राहुल गांधी यांचे महात्मा गांधींना अभिवादन

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशवासियांना गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुवारी काँग्रेस प्रियांका गांधी यांच्यासोबत हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना रस्त्यात अडवण्यात आलं होतं

दिल्ली : ‘जगात कुणालाही घाबरणार नाही आणि अन्यायासमोर कधीही झुकणार नाही’ अशा शब्दांत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ट्विटरवर देशाला गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसांकडून रस्त्यातच अटक करण्यात आलेल्या राहुल गांधींनी मागे हटणार नसल्याचं वक्तव्य या ट्विटमधून केलंय.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशवासियांना गांधी ( Mahatma Gandhi) जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुवारी काँग्रेस प्रियांका गांधी यांच्यासोबत हाथरस सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांना रस्त्यात अडवण्यात आलं होतं


नोएडातल्या यमुना एक्सप्रेस – वेवर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नोएडा प्रशासनानं त्यांच्याविरुद्ध महामारी कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला त्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांना सोडण्यात आलं.

मी असत्यावर सत्यानं विजय मिळवेन आणि असत्याचा विरोध करताना सर्व कष्ट सहन करू शकेन’ गांधी जयतीच्या शुभेच्छा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. उत्तर प्रदेशातील इकोटेक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला. राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासह १५३ कार्यकर्ते आणि ५० इतर लोकांवर भारतीय दंड संहितेच्या १५५/२०२०, १८८, २६९, २७० कलमांतर्गत आणि ३ महामारी अ‍ॅक्ट अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला.