कोव्हिशिल्डच्या दोन डोसमध्ये अंतर किती? नियमात झालेत नवे बदल, जाणून घ्या तपशील

अनेक नागरिकांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशात जावं लागतं. टोकियो ऑलिम्पिकसाठीदेखील अनेक भारतीयांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागणार आहे. यासाठी सरकारनं अशा प्रवाशांना निर्धारित मुदतीपूर्वी कोव्हिशिल्डची लस टोचून घेण्याची मुभा दिलीय. त्यामुळे जुन्या नियमांमुळे अनेक प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी येत असलेल्या अडचणी दूर होणार आहेत. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागत असल्याचं चित्र आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं पुन्हा एकदा कोरोना लसीकरणाबाबतचं धोरण बदललं असून कोरोनावरील कोव्हिशिल्ड या लसीच्या दोन डोसमध्ये किती अंतर असावं,याबाबतही काही नवे नियम केलेत.

    अनेक नागरिकांना शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परदेशात जावं लागतं. टोकियो ऑलिम्पिकसाठीदेखील अनेक भारतीयांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागणार आहे. यासाठी सरकारनं अशा प्रवाशांना निर्धारित मुदतीपूर्वी कोव्हिशिल्डची लस टोचून घेण्याची मुभा दिलीय. त्यामुळे जुन्या नियमांमुळे अनेक प्रवाशांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी येत असलेल्या अडचणी दूर होणार आहेत.

    सध्याच्या नियमानुसार कोव्हिशिल्डची पहिली लस घेतलेल्या नागरिकांना ८४ दिवसांनंतर म्हणजेच १२ ते १६ आठवड्यांनी दुसरी लस घेता येते. मात्र आता नव्या नियमानुसार जर नागरिकांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा ऑलिम्पिक यापैकी कुठल्या काऱणासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा असेल, तर पहिल्या डोसला २८ दिवस झाल्यानंतर ते कधीही कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेऊ शकणार आहेत.

    कोव्हॅक्सिनसाठी सध्याच्या नियमानुसार दोन डोसमध्ये २८ दिवसांचं अंतर राखणं गरजेचं असून कोव्हिशिल्डसाठी मात्र दोन डोसमध्ये ८४ दिवसांच्या अंतराचा नियम आहे. रोगप्रतिकारक शक्ती अधिकाधिक वाढावी, यासाठी हे निकष लावण्यात आले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय नियमांमध्ये अडकून प्रवासावर गदा येऊ नये, यासाठी या धोरणात सरकारनं काही बदल केले आहेत.

    नागरिकांचं कोविन सर्टिफिकेट हे त्यांच्या पासपोर्टशीही जोडलं जाणार आहे. त्यामुळे लसीकरण झाल्याचे वेगळे पुरावे नागरिकांना देण्याची आता गरज उरणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ही मोठी सोय ठरणार आहे.