नवे आयटी नियम हे सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी : रवी शंकर प्रसाद

रवी शंकर प्रसाद म्हणाले की, सरकार राईट टू प्रायव्हसीचा सन्मान करते. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या यूजर्सनी या नव्या नियमांना घाबरण्याची गरज नाही. एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरलेला एखादा आक्षेपार्ह मजकूर कोणी पाठवायला सुरुवात केली याची खातरजमा करणे आणि अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठीच हे नियम तयार करण्यात आले आहेत.

    नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या आयटी नियमांमुळे यूजर्सची प्रायव्हसी धोक्यात येत असल्याचं सांगत व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता त्यावर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलं आहे.

    नवीन आयटी नियम हे केवळ सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळण्यासाठी आहेत, त्याचा यूजर्सना कोणताही धोका नाही. त्यामुळे यूजर्सनी घाबरु नये असं केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलंय. रवी शंकर प्रसाद यांनी ‘कू’ या स्वदेशी अॅपवरुन केंद्र सरकारची या बाबतची भूमिका मांडली आहे.

    रवी शंकर प्रसाद म्हणाले की, सरकार राईट टू प्रायव्हसीचा सन्मान करते. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या यूजर्सनी या नव्या नियमांना घाबरण्याची गरज नाही. एखाद्या गुन्ह्याला कारणीभूत ठरलेला एखादा आक्षेपार्ह मजकूर कोणी पाठवायला सुरुवात केली याची खातरजमा करणे आणि अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठीच हे नियम तयार करण्यात आले आहेत.

    एकाद्या मजकुरामुळे देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि सुरक्षा धोक्यात येत असेल तर किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न, बलात्कार, बालकांचे लैंगिक शोषण अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्यावर परिणामकाररित्या नियंत्रण या नवीन नियमांमुळे आणता येईल असं केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद म्हणाले.