नव्या धोरणानंतर कुठली लस किती रुपयांना? जाणून घ्या सविस्तर दर

केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता देशातील ७५ टक्के जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारवर तर २५ टक्के जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी खासगी हॉस्पिटल्सवर असणार आहे. सरकारच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येणार असून खासगी दवाखान्यांना जास्तीत जास्त १५० रुपये अतिरिक्त सेवाकर आकारता येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. त्यानुसार आता विविध कंपन्यांच्या लसींचे दर काय असतील, हे जाहीर करण्यात आलंय. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केलेल्या घोषणेनुसार केंद्र सरकारनं पूर्वीच्या लसीकरण धोरणावरून यू टर्न घेत नवं धोरण जाहीर केलं. यामध्ये राज्यांवर असलेली लसी खरेदी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारनं पुन्हा स्वतःकडे घेतली आणि खासगी रुग्णालयांना जास्तीत जास्त किती सर्व्हिस चार्ज घेता येईल, याची निश्चिती केली.

    केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार आता देशातील ७५ टक्के जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारवर तर २५ टक्के जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी खासगी हॉस्पिटल्सवर असणार आहे. सरकारच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येणार असून खासगी दवाखान्यांना जास्तीत जास्त १५० रुपये अतिरिक्त सेवाकर आकारता येईल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. त्यानुसार आता विविध कंपन्यांच्या लसींचे दर काय असतील, हे जाहीर करण्यात आलंय.

    कोव्हिशिल्डची लस खासगी दवाखान्यात मिळेल ७८० रुपयांना. यामध्ये लसीची मूळ किंमत ६०० रुपये अधिक ५ टक्के जीएसटी आणि १५० रुपये सेवा शुल्क यांचा समावेश असेल. कोव्हॅक्सिनची किंमत असेल १४१० रुपये. यामध्ये मूळ किंमत १२०० रुपये, ५ टक्के जीएसटी आणि १५० रुपये सेवाशुल्क यांचा समावेश असेल. तर स्पुटनिक व्ही ही लस मिळेल ११४५ रुपयांना. यामध्ये मूळ किंमत ९४८ रुपये, ५ टक्के जीएसटी आणि १५० रुपये सेवाशुल्क आकारण्यात येईल.

    खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या लसींवर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेऊन असणार आहेत. जीएसटी आणि जास्तीत जास्त १५० रुपये सेवाशुल्क यापेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाणार आहे.