तुम्ही भाडेकरू किंवा घरमालक आहात? मग हे नवे नियम समजून घ्या ! आता २ महिन्यांचं भाडं अगोदरच द्यावं लागेल…

नव्या कायद्यांनुसार करार केल्याशिवाय कुणालाही कुठलीही मालमत्ता भाड्याने देता किंवा घेता येणार नाही. त्या त्या राज्यांच्या रेंट ऑथोरिटीसमोर हा करार करणं बंधनकारक असणार आहे. भाड्याचं घर घेताना भाडेकरून घरमालकाला २ महिन्यांचं भाडं ऍडव्हान्समध्ये देणं बंधनकारक करण्यात आलंय. तर याबाबत जे काही वादविवाद असतील, ते दोन महिन्यांत निकाली काढण्याची तरतूदही नव्या कायद्यात करण्यात आलीय. 

  भारतात भाड्याने घर घेणारे आणि स्वतःची मालमत्ता भाड्याने देणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. मात्र अनेकदा यावरून वाद आणि फसवणुकीचे प्रकार घडतात. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारनं टेनन्सी ऍक्टमध्ये काही बदल केलेत. या बदलांमुळे भाडेकरू आणि घरमालक यांच्यातील व्यवहार अधिक सुटसुटीत होणार असून वादांचं प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

  नव्या कायद्यांनुसार करार केल्याशिवाय कुणालाही कुठलीही मालमत्ता भाड्याने देता किंवा घेता येणार नाही. त्या त्या राज्यांच्या रेंट ऑथोरिटीसमोर हा करार करणं बंधनकारक असणार आहे. भाड्याचं घर घेताना भाडेकरून घरमालकाला २ महिन्यांचं भाडं ऍडव्हान्समध्ये देणं बंधनकारक करण्यात आलंय. तर याबाबत जे काही वादविवाद असतील, ते दोन महिन्यांत निकाली काढण्याची तरतूदही नव्या कायद्यात करण्यात आलीय.

  असे आहेत नवे नियम 

  • शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांसाठी नवे कायदे लागू असतील.
  • भाड्याची कमाल आणि किमान मर्यादा निश्चित नसेल. भाडेकरू आणि घरमालक यांच्या परस्पर समझोत्याने ही रक्कम निश्चित होईल
  • करार केल्याशिवाय कुणालाही घर भाड्याने देता किंवा घेता येणार नाही
  • नव्या कायद्यानुसार निवासी मालमत्तांसाठी २ महिन्यांचे, तर व्यापारी मालमत्तांसाठी ६ महिन्याचे भाडे ऍडव्हान्स देणे बंधनकारक असणार आहे.
  • किमान एका महिन्याची नोटीस देऊन घरमालक आपली मालमत्ता रिकामी करण्याचा आदेश देऊ शकेल
  • मालक भाडेकरूवर कुठल्याही जाचक आणि मनमानी अटी घालू शकणार नाही