१ ऑक्टोबरपासून लागू होणार वाहनांच्या टायर्सबाबतचे नवे नियम ; पाहा तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा

भारतात विकल्या जाणाऱ्या टायर्सना काही परीक्षा पास कराव्या लागणार आहेत. ज्यामध्ये टायर स्लिप होणे किंवा घसरणे, ओल्या रस्त्यावरील पकड आणि रोलिंग साऊंड यांचा समावेश आहे. टायर बनवणाऱ्या कंपन्या, कार, बस आणि अवजड वाहनांना हे नियम पाळावे लागतील.

    नवी दिल्ली : 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने रस्ते अपघातातील मृत्यूदरावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोटर वाहन कायदा आणला होता. वाहतुकीचे नियम कडक करुन, अपघात कमी करणे, इंधन वाचवणे या उद्देशाने 2021 मध्ये, वाहनांच्या टायर्सबाबत काही नियमावलीचा प्रस्ताव ठेवला आहे. ज्यामध्ये टायरचे घर्षण आणि ओल्या रस्त्यावरील टायरची ग्रीप आणि त्यातून होणाऱ्या आवाजाबाबत एक नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. आता काही नवे नियम त्यामध्ये अॅड करण्यात आले आहेत.

    या नियमांनुसार भारतात विकल्या जाणाऱ्या टायर्सना काही परीक्षा पास कराव्या लागणार आहेत. ज्यामध्ये टायर स्लिप होणे किंवा घसरणे, ओल्या रस्त्यावरील पकड आणि रोलिंग साऊंड यांचा समावेश आहे. टायर बनवणाऱ्या कंपन्या, कार, बस आणि अवजड वाहनांना हे नियम पाळावे लागतील.

    जागतिक बँकेच्या अहवालानुसार, दरवर्षी जवळपास 4.50 लाख भारतात रस्ते अपघात होतात. म्हणजेच ताशी 53 अपघात होऊन, या दुर्घटनांमध्ये चार मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. तसेच जगभरात असलेल्या वाहनांच्या एकूण संख्येपैकी केवळ 1 टक्के वाहने भारतात आहेत.

    ऑटो इंडस्ट्रीच्या जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांचे टायर अधिक चांगले आणि विश्वासार्ह असावेत, हे रेटिंग आणण्याचं उद्दिष्ट आहे. सरकार कारच्या गुणवत्तेला प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारण्याच्या दृष्टीने काम करत आहे. भारत आता ऑटो मोबाईल एक्सपोर्ट हब बनत असून येणाऱ्या काळात अशा नियमांची आवश्यकता असेल.