'Virus Passport' launch; China became the first country in the world

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवला जात आहे. हा धोका पाहता गुजरात हायकोर्टाने आरोग्य सुविधा वाढविण्याचे निर्देश गुजरात सरकारला दिले.

    दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तवला जात आहे. हा धोका पाहता गुजरात हायकोर्टाने आरोग्य सुविधा वाढविण्याचे निर्देश गुजरात सरकारला दिले.

    चीनसारखे नियम भारतात लागू करणे अशक्य आहे, असे मतही न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि भार्गव कारिया यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. तिसऱ्या लाटेनंतर चौथीही लाट येईल.

    कारण लोकं मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालनच करीत नाही, अशी टीप्पणी त्यांनी केली. चीनसोबत भारताची तुलना करणे योग्य नसून देशात आपल्याला आरोग्य सुविधा वाढवायला हव्यात, असे मतही खंडपीठाने नोंदविले.