गायीच्या शेणापासून बनलेला वैदिक पेंट लवकरच बाजारात, नितीन गडकरींची घोषणा

अनेक कंपन्या वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या रंगाचा पुरस्कार करत असतात. काही रंगांमुळे भिंतीं मजबूत होतात, तर काही रंग वॉटर प्रुफ म्हणून प्रसिद्ध असतात. ते रंग लावले की पाण्याचा किंवा पावसाचा दुष्परिणाम भिंतींवर होत नाही. आता खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं असाच एक नवा रंग बाजारात आणण्याचा चंग बांधलाय.

आपलं घर आणि इमारत सुंदर दिसावी, यासाठी त्याला उत्तम प्रतिचा रंग देण्याची पद्धत आहे. हा रंग केवळ आकर्षकपणासाठी नव्हे, तर भिंतींच्या मजबुतीचंही काम करत असतो. त्यामुळे उत्तमोत्तम कंपन्यांचे रंग विकत घेण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो.

अनेक कंपन्या वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्या रंगाचा पुरस्कार करत असतात. काही रंगांमुळे भिंतीं मजबूत होतात, तर काही रंग वॉटर प्रुफ म्हणून प्रसिद्ध असतात. ते रंग लावले की पाण्याचा किंवा पावसाचा दुष्परिणाम भिंतींवर होत नाही. आता खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं असाच एक नवा रंग बाजारात आणण्याचा चंग बांधलाय.

Posted by Nitin Gadkari on Wednesday, December 16, 2020

या रंगाचं नाव आहे वैदिक पेंट. गायीच्या शेणापासून हा रंग तयार करण्याचा दावा सरकारकडून करण्यात आलाय. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी हा प्रयोग करण्यात आलाय. डिस्पेंटर आणि इमल्शन अशा दोन प्रकारांत हा रंग उपलब्ध होणार आहे.

हा रंग इको फ्रेंडली, अविषारी, अँटी बॅक्टेरियल, एँटी फंगल आणि वॉशेबल असणाऱ आहे.

भिंतीला लावल्यानंतर केवळ चार तासात हा रंग सुकणार आहे. यामुळे गुरं पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि प्रत्येक शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न ५५ हजार रुपयांनी वाढेल, असा दावा गडकरींनी केलाय.