CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबात सरकारचा मोठा निर्णय

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान '२०२१ च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,' असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सांगण्यात आलं होतं.

दिल्ली : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभरात खबरदारी घेतली जात आहे. अशात CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाही जवळ आल्या आहेत. या परीक्षांबाबात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

जानेवारी-फेब्रुवारीमध्ये CBSE बोर्डाची परीक्षा होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. दरम्यान ‘२०२१ च्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी परीक्षा घेण्यात येतील. याबाबत अद्याप चर्चा सुरू असून बोर्डाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच त्याही तारखा जाहीर केल्या जातील,’ असं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सांगण्यात आलं होतं.

कोरोना काळात परीक्षा होणार की नाही, याबाबत सुरुवातीपासूनच संभ्रम होता.