ना आता बँकेत जाण्याची गरज, फक्त एका फोनवर तुमची बँकेतली कामं घरबसल्या होणार

    नवी दिल्ली: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये तुमचे खाते असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँकेतील व्यवहारासंबंधी कोणतेही काम असेल तर बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा ऑनलाईन लॉगिन करण्याची गरज नाही. फक्त एका फोनवर तुमचं काम होऊ शकतं.

    एका फोनवर तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकता. जर, तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पैसे पोहोच करेल. याशिवाय पैसे जमा करायचे असतील तर बँक प्रतिनिधी पैसे जमा करण्याचं देखील काम करु शकतात.

    एसबीआयच्या कोणत्या सेवा सुविधा फोनवर उपलब्ध

    आजकाल अनेक बँकांनी डोअरस्टेव बॅकिंग सुविधा सुरु केलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बँक ग्राहकांना घरपोहोचं बँक सेवा दिली जाते. बँक रोख रक्कम ग्राहकांना देणे, ग्राहकांकडून रक्कम स्वीकारणे, चेक जमा करुन घेणे, चेकची मागणी, फार्म 15H स्वीकराणे, डीमांड ड्राफ्ट डिलीव्हरी, टर्म डिपॉजिट सल्ला या शिवाय इतर सेवा देखील ग्राहकांना पुरवल्या जातात. केवायसी कागदपत्रे देखील स्वीकारली जातात.