ना ‘व्हिटॅमिन’ची गोळी, ना ‘वाफ’ ;केंद्र सरकारकडून कोरोनाची नवीन मार्गदर्शक नियमावली जाहीर

ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती.

    नवी दिल्ली: देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग बराच मंदावला आहे. कोरोना बाधितांची कमी होता असलेले संख्या लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने(Union health ministry) कोरोना उपचारांची नवीन मार्गदर्शक नियमावली (Covid management guidelines)जारी केली आहे. या नियमावालीमध्ये आधी कोरोना उपचारासाठी जे उपाय केले जात होते, जी औषधे दिली जात होती ती हटविण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे वाफ घेणे, व्हिटॅमिनची गोळी खाणे आदी गोष्टी यामध्ये आहेत.

    कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांना आधी ‘या’ गोष्टी घेण्याचे सल्ले देण्यात आले होते. परंतू आता नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार कोरोनाग्रस्तांना हे न करण्याचा सल्ला दिला जाणार आहे.

    नव्या मार्गदर्शक नियमावलीनुसार हे करायचे नाहीये ..

    • वाफ घ्यायची नाहीये.
    • कोणतेही अँटीबायोटीक घ्यायचे नाहीये. कोणतीही व्हिटॅमिनची गोळी किंवा झिंकची गोळी घ्यायची नाहीये.यव्हरमेक्टीनचा वापर करायचा नाहीये.
    • Doxycycline, hydroxychloroquine चा वापर करायचा नाही.
    • ताप आल्यावरच फक्त पॅरॅसिटॅमोल गोळी घ्यायची आहे, अन्यथा नाही.

    ऑक्सिजन आणि स्टेरॉईंडचा वापर योग्य प्रकारे केला जावा. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांसाठी दिलासा देणारी प्लाझ्मा थेरपी केंद्र सरकारने कोविड ट्रिटमेंट प्रोटोकॉलमधून हटविली होती. याता पुन्हा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी नवीन गाईडलाईन जारी करण्यात आली आहे.