नोएडा पोलिसांनी शेतकरी आंदोलकांना घेतले ताब्यात

आम्हाला आंदोलन करण्यापासून पोलीस रोखू शकत नसल्याचे मत आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. नोएडाच्या बाजू आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन डॉ. आंबेडकर मेमोरिअल पार्कमध्ये शिफ्ट केले आहे. पोलिसांनी आम्हाला ते कोणत्याही प्रकारची माहिती न देता ताब्यात घेतले आहे. परंतु आम्हाला आंदोलन करण्यापासून पोलीस रोखू शकत नसल्याचे मत आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. आमची मुक्ता केल्यानंतर आम्ही पुन्हा दिल्लीकडे कूच करणार असल्याचेही आंदोलकांनी म्हटले आहे.

 

मात्र आंदोलक रस्त्यांवर बसल्यामुळे सार्वाजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पार्कमध्ये आणल्याची माहिती नोएडा डीसीपी राजेश कुमार यांनी दिली आहे.

आंदोलकांना ताब्यात घेऊन सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होईल असे कोणतेही पाऊल उचलू नका अशी विनंती केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.