आता बांगलादेशात नराधमांना फाशी; जनतेच्या आक्रोशापुढे झुकले सरकार

दिल्ली (Dehli) :  बांगलादेशात आता बलात्कार करणाऱ्या नराधमांना फासावर चढविले जाणार आहे. नुकत्याच घडलेल्या एकामागोमाग एक घटना आणि जनतेचा आक्रोश पाहू जाता बांगलादेशच्या कॅबिनेटने बलात्काराच्या प्रकरणातील अधिकाधिक शिक्षा जन्मठेपेवरून फाशीच्या शिक्षेपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला आणि बाल अत्याचार अधिनियमात दुरुस्ती संदर्भातील अध्यादेशही जारी करण्याची शक्यता आहे.

दिल्ली (Dehli) :  बांगलादेशात आता बलात्कार करणाऱ्या नराधमांना फासावर चढविले जाणार आहे. नुकत्याच घडलेल्या एकामागोमाग एक घटना आणि जनतेचा आक्रोश पाहू जाता बांगलादेशच्या कॅबिनेटने बलात्काराच्या प्रकरणातील अधिकाधिक शिक्षा जन्मठेपेवरून फाशीच्या शिक्षेपर्यंत वाढविण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला आणि बाल अत्याचार अधिनियमात दुरुस्ती संदर्भातील अध्यादेशही जारी करण्याची शक्यता आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने अध्यादेश जारी केला जाईल अशी माहिती सरकारी सूत्राने दिली.

९ महिन्यात एक हजार प्रकरणे
— मानवाधिकार संघटनेच्या एका अहवालानुसार बांगलादेशात गेल्या काही वर्षात लैंगिक शोषणाच्या प्रकरणात वाढ झाली आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान जवळपास 1000 अशा गंभीर घटना घडल्या ज्यात पाच प्रकरणात सामूहिक बलात्काराच्या घटनांचा समावेश होता. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून जनतेत आक्रोश व्याप्त होता परंतु नुकत्याच घडलेल्या एका घटनेने आगीत तेल ओतण्याचेच काम केले.

अन् उसळली संतापाची लाट
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. या व्हीडिओत दक्षिण पूर्व जिल्ह्यातील काही लोक एका महिलेला निर्वस्त्र फिरवित असल्याचे दिसून आले होते. मानवाधिकार आयोगाच्या माहितीनुसार, पीडितेवर वर्षभपरापासून बलात्कार केला जात होता. हा व्हीडिओ समोर येताच जनतेत संतापाची लाट उसळली. नराधमांना फासावर चढविण्यासाठी आंदोलनही करण्यात आले. राजधानी ढाका येते महिला तसेच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यामुळेच सरकारने जनभावनेची दखल घेत अखेर नराधमांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.