Now the tractor will run on CNG

देशातील हवा प्रदूषणाचा मुद्दाही गंभीर असून हवा प्रदूषण रोखण्यासाठी जास्तीत-जास्त वाहनांना सीएनजीचा उपयोग करण्याचा सरकारचा मानस आहे. या सुधारणांनुसार सध्या डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर उपकरणे आणि वाहनांना सीएनजी बायो-सीएनजी आणि एलएनजी इंधनावर चालणारी इंजिन बसवता येणार आहेत. याविषयी मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली आहे.

    दिल्ली : रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने देशातील ग्रामीण भागात स्वच्छ इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये सुधारणांना मान्यता दिली आहे.

    देशातील हवा प्रदूषणाचा मुद्दाही गंभीर असून हवा प्रदूषण रोखण्यासाठी जास्तीत-जास्त वाहनांना सीएनजीचा उपयोग करण्याचा सरकारचा मानस आहे. या सुधारणांनुसार सध्या डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर उपकरणे आणि वाहनांना सीएनजी बायो-सीएनजी आणि एलएनजी इंधनावर चालणारी इंजिन बसवता येणार आहेत. याविषयी मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली आहे.

    यासंदर्भात 1989 साली केलेल्या एका सुधारणेला मंत्रालय नोटिफाईड करत असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी यंदाच्या फेब्रुवारीमध्ये सीएनजी इंजिनमध्ये परिवर्तित केलेल्या आणि आधी डिझेल इंजिनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या ट्रॅक्टरचे अनावरण केले होते.

    या बदलांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतील आणि मोठ्या संख्येनं रोजगाराच्या संधीही तयार होतील, असे या वेळी बोलताना गडकरी म्हणाले होते.