भारताच्या नव्या सरन्यायाधीशांचे नाव निश्चित, एन. व्ही. रमना होणार नवे सरन्यायाधीश

सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्या. एन. व्ही. रमना यांचं नाव सरन्यायाधीश पदासाठी निश्चित करण्यात आलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावावर आज (मंगळवार) शिक्कामोर्तब केलं. राष्ट्रपतींच्या मंजुरीचं पत्रदेखील न्यायालयाला पाठवण्यात आलंय. 

    भारताचे नवे सरन्यायाधीश कोण होणार, याची नेहमीच जनतेला उत्सुकता असते. यावेळीदेखील अशीच उत्सुकता होती. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून न्या. एन. व्ही. रमना हे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालंय.

    सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्या. एन. व्ही. रमना यांचं नाव सरन्यायाधीश पदासाठी निश्चित करण्यात आलंय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावावर आज (मंगळवार) शिक्कामोर्तब केलं. राष्ट्रपतींच्या मंजुरीचं पत्रदेखील न्यायालयाला पाठवण्यात आलंय.

    विद्यमान सरन्यायाधीस एस. ए. बोबडे यांचा कार्यकाल याच महिन्यात संपत असून २३ एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे २४ एप्रिलपासून रमना सरन्यायाधीशपदाचा कारभार पाहतील. देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून रमना शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडणार आहे.