काँग्रेस सोडून जाणारे संघाचे; राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचे आवाहन केले. भाजपाकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका.

    दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून गेलेल्यांवर टीका केली. ज्यांना भीती वाटते त्यांनी काँग्रेसमधून खुशाल जावे. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही असे लोक काँग्रेसमध्ये आहेत. त्यांचे स्वागत आहे.

    काँग्रेस सोडून गेलेले सर्व लोक संघाशी संबंधित होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना फेक न्यूजमुळे घाबरून न जाण्याचे आवाहन केले. भाजपाकडून येणाऱ्या फेक न्यूजमुळे घाबरून जाऊ नका.

    कोरोना काळात उत्तरप्रदेशात चांगले काम केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत असतील तर त्यांच्यावर हसा. भारताच्या सीमाभागात चीनने घुसखोरी केली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर त्यांच्यावरही हसा, असे राहुल यांनी सांगितले.