राजीनामा देणाऱ्या 12 माजी मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदारी; प्रसाद, जावडेकरांना उपाध्यक्षपद!

पुढील वर्षाच्या प्रारंभी होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि हर्षवर्धनसह काही नेत्यांना संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. मंत्रिमंडळाबाहेर पडल्यानंतर त्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    दिल्ली : पुढील वर्षाच्या प्रारंभी होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, रमेश पोखरियाल ‘निशंक’ आणि हर्षवर्धनसह काही नेत्यांना संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. मंत्रिमंडळाबाहेर पडल्यानंतर त्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    प्रसाद आणि जावडेकर यांची पक्षात राष्ट्रीय सरचटणीसपदी अथवा उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची तसेच त्यांना निवडणूक असलेल्या राज्यात महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचेही समजते.

    7 जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या झालेल्या फेरबदल व विस्तारात भाजपा सरचिटणीस भुपेंद्र यादव आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नपूर्णादेवींसह पक्षात संघटनात्मक जबाबदारी सांभाळणाऱ्या पाच नेत्यांना मंत्रिपद देण्यात आले होते. पक्षात एक व्यक्ती एक पद तत्त्व लागू असल्यामुळेच सरकारमध्ये सहभागी करण्यात आलेल्या नेत्याच्या जागी संघटनेत नव्यांना संधी दिली जाणार आहे.