Navy's Sea Harrier aircraft on the shores of the Bandra Bandstand; Photo shared by Aditya Thackeray

अख्खे जग कोरोना महामारीने त्रस्त झाले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी काही देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक तसेच इतर निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेत काही देशात अजूनही विमान वाहतूक सुरू आहे. कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय कोणालाही इतर देशात प्रवास करता येत नाही. पण दिल्ली-हाँगकाँग प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

    दिल्ली : अख्खे जग कोरोना महामारीने त्रस्त झाले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी काही देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. वाहतूक तसेच इतर निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेत काही देशात अजूनही विमान वाहतूक सुरू आहे. कोरोना चाचणी अहवाल असल्याशिवाय कोणालाही इतर देशात प्रवास करता येत नाही. पण दिल्ली-हाँगकाँग प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत.

    दिल्लीहून १८८ प्रवाशांना घेऊन विस्ताराच्या एका विमानाने हाँगकाँगकडे प्रस्थान केले. विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. ९ तासाच्या प्रवासानंतर हे सर्व प्रवासी जेव्हा हाँगकाँगमध्ये उतरले तेव्हा तेथील विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवाशांची पुन्हा कोरोना चाचणी केली तेव्हा ५२ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.

    भारतातून हाँगकाँगला गेलेल्या १८८ पैकी ५२ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच विमानतळावर गोंधळ उडाला होता. विमान प्रवासात कोरोनाचा संसर्ग कसा झाला, हा प्रश्न सर्वांना पडला होता. हाँगकाँग विमानतळ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, कोरोना संक्रमण 72 तासांनी होते. दिल्ली विमानतळावर असतानाच प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असेल किंवा भारतात केल्या जात असलेल्या टेस्टमध्ये काही कमतरता असेल. त्यामुळेच कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले नाही. हाँगकाँगमध्ये सर्व प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.