प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

देशभरात ब्लॅक फंगसचा प्रकोप वाढत चालला आहे. हे पाहता केंद्र सरकारने या आजारासाठी वापरले जाणारे इंफोटेरेसिन बी या इंजेक्शनच्या 3 लाख मात्रा विदेशातून मागविल्या आहे. 3 लाख इंजेक्शनचा पुरवठा भारताला 31 मेपर्यंत केला जाणार आहे. याचबरोबर या इंजेक्शनचे देशातील उत्पादन वाढवून ते 3.80 लाख इंजेक्शन प्रतिमहिना करण्यात आले आहे.

    दिल्ली :  देशभरात ब्लॅक फंगसचा प्रकोप वाढत चालला आहे. हे पाहता केंद्र सरकारने या आजारासाठी वापरले जाणारे इंफोटेरेसिन बी या इंजेक्शनच्या 3 लाख मात्रा विदेशातून मागविल्या आहे. 3 लाख इंजेक्शनचा पुरवठा भारताला 31 मेपर्यंत केला जाणार आहे. याचबरोबर या इंजेक्शनचे देशातील उत्पादन वाढवून ते 3.80 लाख इंजेक्शन प्रतिमहिना करण्यात आले आहे.

    महाराष्ट्रात ब्लॅक फंगसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. राज्यात ब्लॅक फंगसचे 1500 रुग्ण असून 90 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्याला 2 लाख इंजेक्शनची गरज आहे.

    यामुळे महाराष्ट्राने केंद्राकडे 2 लाख इंजेक्शनची मागणी केली असता, आतापर्यंत राज्याला केवळ 16 हजार इंजेक्शनच मिळाले आहे. उर्वरित इंजेक्शन मिळायला 31 मे ची वाट पाहावी लागणार आहे.