अमेरिका आणि युरोपातील मदत दाखल व्हायला सुरुवात, जपानच्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची होणार मदत

कोरोना रुग्णांवर उपचार करताना सर्वात जास्त कमतरता जाणवत आहे ती ऑक्सिजनची. देशातील ऑक्सिजनचा पुरवठा हा रुग्णांच्या तुलनेत अत्यंत कमी असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागल्याच्या घटना देशात घडत असल्याचं लक्षात आल्यानंतर भारतानं इतर देशांमधून ऑक्सिजन आणायला सुरुवात केलीय. इतर देशांतून येणारी मदत भारतात पोहोचायला आता सुरुवात झालीय. 

    देशात कोरोनाची दुसरी  लाट आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. त्यामुळे देशातील आरोग्य सुविधांवर कमालीचा ताण आला असून अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून देशातील इतर राज्यांतही बिकट परिस्थिती उद्भवू लागल्याचं चित्र निर्माण झालंय.

    कोरोना रुग्णांवर उपचार करताना सर्वात जास्त कमतरता जाणवत आहे ती ऑक्सिजनची. देशातील ऑक्सिजनचा पुरवठा हा रुग्णांच्या तुलनेत अत्यंत कमी असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागल्याच्या घटना देशात घडत असल्याचं लक्षात आल्यानंतर भारतानं इतर देशांमधून ऑक्सिजन आणायला सुरुवात केलीय. इतर देशांतून येणारी मदत भारतात पोहोचायला आता सुरुवात झालीय.

    अमेरिकेतून ऑक्सिजन निर्मिती युनिट्स घेऊन येणारं विमान दिल्लीत दाखल झालंय. यामध्ये ऑक्सिजन सपोर्ट, ऑक्सिजन कॉंसंट्रेटर्स, पीपीई किट आणि इतर साहित्य आहे. हे पहिलं विमान आता दाखल झालं असून यामागून आणखी काही विमानंदेखील अशा साहित्यासह देशात दाखल होणार आहेत.

    युरोपातील रोमानियातूनही ७५ ऑक्सिजन सिलिंडर्स आणि ८५ कॉन्संट्रेटर्स भारतात दाखल झालीयत. तर या कठीण परिस्थितीत जपानदेखील मदतीला धावून आलाय. जपानने भारताला ३०० ऑक्सिजन सिलिंडर्स आणि ३०० व्हेंटिलेटर्स पाठवण्याचा निर्णय घेतलाय. इतर देशातील या मदतीचा भारतातील रुग्णांना चांगलाच फायदा होणार आहे. मात्र यापुढे देशातील परिस्थितीचा विचार करून आत्मनिर्भरता वाढवण्याचीही गरज व्यक्त होतेय.