Pakistan connection of terrorists Five terrorists arrested from Delhi; The investigation revealed shocking information

दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने धडाकेबाज कारवाई करत पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच भारतात आतंकवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानी कनेक्शनही पून्हा एकदा उघड झाले आहे.

सोमवारी सकाळच्या सुमारास दिल्लीच्या शकरपूर भागात  दिल्ली पोलिस स्पेशल सेल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दोघांकडूनही फायरिंग झाले असून एकूण १३ राऊंड झाडण्यात आले आहेत. यानंतर पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यातील दोघे दहशतवादी  पंजाब तर, ३ जण कश्मीरचे  असल्याची माहिती स्पेशल सेलने दिली.

ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं हस्तगत करण्यात आली आहेत. तसेच एक लाख रुपयांची रोकड आणि दोन किलो हेरोईनही जप्त करण्यात आले आहे.

नार्को टेरिझमसाठी या समुहाचा ISI ला पाठिंबा होता. यातील काश्मिरी दहशतवादी हिजबुल मुजाहिदीनसाठी काम करत असल्याचा संशय आहे. पाकिस्तानातूच या करावायांचे कट रचले जातात. आतंकवादी संघटनेच्या नावाची अद्याप खात्री होणं बाकी असल्याची माहिती स्पेशल सेल डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी दिली आहे.