हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचतोय पाकिस्तान, अयोध्या प्रकरणाचा घेणार बदला

पाकिस्तान भारतातील दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करुन भारतीय नेत्यांना मारण्याचे कारस्थान रचले आहे. राम मंदिराचा निकाल भारताच्या बाजूने लागल्यामुळे पाकिस्तानचा आगपाखड झाला आहे. याचाच बदला घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीमधील वरिष्ठ नेत्यांना निशाणा करण्यात आला आहे.

दिल्ली : एकीकडे अयोध्येत रामजन्मभूमी निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीसाठी सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पाडला. आता मंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. तर पाकिस्तान राम मंदिर विरोधात कटकारस्थान रचत असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचत आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिली आहे. तसेच याबाबत ३ राज्यांना माहिती देण्यात आली आहे तर सुरक्षेच्या दृष्टिने अलर्ट केला आहे. 

गुप्तचर यंत्रणांनी राज्यांना दिलेल्या माहितींनुसार पाकिस्तानी भारतात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित आरोपींचा वापर करुन. हिंदू नेत्यांना मारण्याचा कट रचत आहे. अशी माहिती इंटेलिजेंस ब्यूरोने वेगवेगळ्या राज्यांना दिली आहे. 

आरएसएस आणि भाजपा नेते मुख्य निशाण्यावर 

पाकिस्तान भारतातील दाऊद इब्राहिम गँगमधील सदस्यांचा वापर करुन भारतीय नेत्यांना मारण्याचे कारस्थान रचले आहे. राम मंदिराचा निकाल भारताच्या बाजूने लागल्यामुळे पाकिस्तानचा आगपाखड झाला आहे. याचाच बदला घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीमधील वरिष्ठ नेत्यांना निशाणा करण्यात आला आहे. या नेत्यांना मारुन राम मंदिर उभारणीचा बदला घेण्याचे कारस्थान रचत आहे. ही माहिती मिळाल्यावर भारतातील सर्व गुप्तचर यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. गुजरातमधील दहशतवादी विरोधी फथकाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी गृह राज्यमंत्री गोरधन जडाफिया यांच्या कथित कटाचे कारस्थान उधळून लावले आहे. यामध्ये एका शार्प शूटरला अटक करण्यात आले आहे. 

गुजरातमधील एटीएस पथकाने बुधवारी रात्री एका हॉटेलमध्ये छापा मारला यात त्यांनी एका शार्प शूटरला अटक केली आहे. बुधवारी रात्री उशीरा अहमदाबादमधील रिलीफ रोडवरील हॉटेल व्हिनसमध्ये छापा मारला यात शार्प शूटरने पथकावर गोळीबार केला परंतु या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आरोपी इरफान शेख उर्फ कालिया याला अटक करण्या आले आहे. अधिक तपासामध्ये मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तिय गँगस्टर छोटा शकीलच्या टीम मधील असल्याचा समजते आहे. 

या घटनेमुळे देशातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. तसेच हिंदुत्ववादी नेत्यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.