Tokyo Paralympic 2020 : 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताचा डबल धमाका, सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळवलं

सध्या जपानच्या टोकियो शहरात पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु आहेत. 50 मीटर एअर पिस्टल या प्रकारात नरवालनं सुवर्णपदक तर सिंहराज अधानानं रौप्यपदक मिळवलं आहे. यातील सिंहराजने याआधी देखील कांस्य पदकाची कमाई केली होती. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदक मिळवलं होतं.

    आजचा दिवस देशासाठी सुवर्ण दिवस असल्याचं म्हटल्यासा काही वावगं ठरणार नाही. कारण, मनीष नरवालनं व सिंहराज अधाना यांनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 50 मीटर एअर पिस्टल प्रकारात देशाला सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळवून दिलं आहे. त्यामुळे या दोन खेळाडूनी टोकियोमध्ये डबल धमाका केला आहे.

    सध्या जपानच्या टोकियो शहरात पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु आहेत. 50 मीटर एअर पिस्टल या प्रकारात नरवालनं सुवर्णपदक तर सिंहराज अधानानं रौप्यपदक मिळवलं आहे. यातील सिंहराजने याआधी देखील कांस्य पदकाची कमाई केली होती. अधानाने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात कांस्य पदक मिळवलं होतं.

    दरम्यान, याआधी भारताला अवनी लेखरानं 10 मीटर शूटिंगमध्ये तर सुमित अंतिलनं भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्यामुळे आता भारताकडे एकून 15 पदकं झाली आहेत.