parliament

संसदेच्या २० दिवसीय पावसाळी अधिवेशनात सरकारला २९ विधेयके संमत करून घ्यायची असल्याची माहिती सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेतील राजकीय नेत्यांसोबतच्या बैठकीत दिली आहे.

    नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनास उद्यापासून (दि.१९ जुलै) सुरु होत आहे. याआधी आज संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पावसाळीस सत्रात होणाऱ्या कामगाजाबाबत ही बैठक असणार आहे.

    संसदेच्या २० दिवसीय पावसाळी अधिवेशनात सरकारला २९ विधेयके संमत करून घ्यायची असल्याची माहिती सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्यसभेतील राजकीय नेत्यांसोबतच्या बैठकीत दिली आहे . त्यात डीएनए टेक्नॉलॉजी, असिस्टंट रिप्रोडक्टिव, ट्रिब्युनल रिफॉर्म या विधेयकांचा समावेश आहे. यातील ६ विधेयके सध्याच्या अध्यादेशांची जागा घेतील, तसेच २ विधेयके वित्तीय व्यवहारविषयक आहेत, असे त्यांनी सांगितले.

    विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी कोविड-१९ साथ, शेतकऱ्यांचे आंदोलन, सहकारी संघराज्य, चीनच्या कारवाया आणि जम्मू व काश्मीर यासंबंधी चिंता व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अफगाणिस्तानावर चर्चा घेण्याची सूचना केली. टीएमसीचे डेरेक ओब्रायन यांनी सांसदीय समितीकडून अधिकाधिक विधेयकांची छाननी करण्याची मागणी केली. याशिवाय कॉंग्रेसने देखील आपल्या खासदारांची आज महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक व्हर्चुअली आयोजित होणार आहे.