‘स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी’ राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी; शेतकरी नेत्यांच्या राजकीय पक्षांना कानपिचक्या

शेतकरी आपली लढाई स्वतःलढत आहेत, आणि लढत राहणार, त्यामुळे राजकीय नेत्यांना कधीही शेतकऱ्यांच्या मंचावर स्थान दिले जाणार नाही

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरात ‘भारत बंद’ आंदोलन करण्यात आले. देशभरात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या आंदोलनाच्या नावाखाली अनेक राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये आपल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झालेले होते. परंतु आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी आलेल्या राजकीय पक्षांना शेतकरी नेत्यांनी चांगलेच सुनावले आहे,

‘ आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत आहोत. आम्हाला राजकारणाशी काहीकाही संबंध नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा योगी आदिनाथ यांच्या विरोधात नाही आहोत. तर केवळ त्यांनी बनवलेल्या काळ्या कायद्यांच्या विरोधात आहोत. शेतकऱ्यांना राजकारणाशी काही घेणं देण नसल्याचे, मत किसान एकता संघटनेच्या गीता भाटी यांनी केली आहे.

याबरोबरच आंदोलनात सहभागी झालेल्या विरोधी पक्षांनी जेव्हा संसदेत हे कायदे पास होता असताना कोणत्याही प्रकारचा आक्षेप नोंदवला नाही, त्यांना इतकीच शेतकऱ्यांची काळजी आहे तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे मत भारतीय किसान युनियनचे जिल्हा अध्यक्ष गुरमीत सिंह यांनी केली आहे.
विरोधीपक्ष हे केवळ दिखावा करत आहेत. मग ते बसपा असो, काँग्रेस असो वा बीएसपी वा एसपी हो . हेर सगळे एकमेकांची नातवंडे आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी दिखावा केला जात आहे. परंतु शेतकरी आपली लढाई स्वतःलढत आहे.आणि लढत राहणार, त्यामुळे राजकीय नेत्यांना कधीही शेतकऱ्यांच्या मंचावर स्थान दिले जाणार नसल्याचे मत ही गुरमीत या व्यक्त केले.