पवार साहेब महाराष्ट्राची शान : नवनीत कौर राणा

महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत- नवनीत राणा

 

नवी दिल्ली : आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत. राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरु शकत नाही. जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, अशी प्रतिक्रिया नवनीत कौर राणा यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर खासदार नवनीत कौर राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करु शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय.

दरम्यान, मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचं सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहेत