मोबाईल अ‍ॅप, ऑनलाईन ऑर्डरद्वारे दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी

व्या नियमानुसार, मोबाइल अ‍ॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ दिल्लीतील सर्व मद्याच्या दुकानांना डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त एल-१४ परवाना असणाऱ्यांनाच ही परवानगी आहे.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत आहे. मात्र अद्याप कोरोनाच्या मृत्यूच्या संख्ये घट झालेली नाही. तसेच दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दिल्ली सरकारने मद्यप्रेमींना खुशखबर देत दिल्लीत मद्याच्या होम डिलिव्हरीसाठी परवानगी दिली आहे.

    नव्या नियमानुसार ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून होम डिलिव्हरीसाठी मद्याची ऑर्डर दिली जाऊ शकते. यामध्ये देशी आणि विदेशी मद्याचा समावेश आहे. दिल्ली उत्पादन शुल्क (दुरुस्ती) नियम, २०२१ मध्ये बदल करण्यात आल्यानंतर मोबाइल अ‍ॅप्स किंवा ऑनलाइन वेब पोर्टलचा वापर करून ऑनलाइन ऑर्डरद्वारे दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी दिली जाणार आहे.
    यापूर्वी नियमानुसार, दिल्लीत फक्त एल-१३ परवाना असणाऱ्यांनाच डिलिव्हरीसाठी परवानगी होती. ई-मेलद्वारे किंवा फॅक्सद्वारे ऑर्डर मिळाली असेल तरच निवासस्थानावर डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मोबाइलवरुन ऑर्डर घेण्यास मात्र मनाई होती.

    मात्र आता नव्या नियमानुसार, मोबाइल अ‍ॅप आणि पोर्टलच्या माध्यमातून मद्याची होम डिलिव्हरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ दिल्लीतील सर्व मद्याच्या दुकानांना डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. फक्त एल-१४ परवाना असणाऱ्यांनाच ही परवानगी आहे.

    लॉकडाउन जाहीर झाल्यानंततर दिल्लीत मद्याच्या दुकानांबाहेर भली मोठी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले होते . यामुळे करोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मद्याच्या घरपोच सुविधेचा पर्याय सरकारला सुचवला होता.