पेट्रोल नव्वदी पार; डिझेलही महागलं

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल २५ पैशांनी महागलं आहे. तर, मुंबईत पेट्रोलच्या दरात २४ पैशांची वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल २५ पैशांनी महागलं आहे. तर, मुंबईत पेट्रोलच्या दरात २४ पैशांची वाढ झाली आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाने ५५ डाॅलर प्रती बॅरलची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कंपन्यांवरील दबाव वाढल्याने ही दर वाढ झाली आहे.

दिल्लीत पेट्रोल २५ पैशांनी महागलं आहे. तर, मुंबईत पेट्रोलच्या दरात २४ पैशांची वाढ झाली आहे. कोलोकात्यात ४४ पैसे आणि चेन्नईत २२ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या पेट्रोलचा दर ९१ रुपयांच्या पार गेला आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा भाव ८४.४५ रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत ९१.०७ रुपये प्रति लीटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ८५.९२ रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत ८७.१८ रुपये प्रति लीटर आहे.