कोरोना काळात व्यावसायिक घराण्यांचा परोपकार ; १२००० कोटींचा खर्च वाढला

आर्थिक वर्ष २०२० मध्ये संपूर्ण खासगी क्षेत्राने परोपकारासाठी दिलेला निधी ६४००० कोटी रुपये होता ज्यात २० टक्के व्यावसायिक घराणे व खासगी स्तरावर करण्यात आला. या सकल परोपकारी निधीत विदेशातून प्राप्त धन, कंपन्या, किरकोळ आणी उच्च प्रतिष्ठित व्यक्ती व कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीचाही समावेश आहे. यात केवळ व्यावसायिक घराण्यांनी दिलेली देणगीच १२००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

    दिल्ली : देशात कोरोना काळात व्यावसायिक घराण्यांनी खासगी स्तरावर केलेल्या परोपकारी कार्याला वेग आला आहे. २०२० मध्ये कोरोना साथ रोगाच्या काळात व्यावसायिक घराण्यांचा परोपकारावर केलेला व्यय १२००० कोटींवर पोहोचला आहे. हा खर्च २०१९ नंतर संपूर्ण खासगी क्षेत्रात झालेल्या खर्चाच्या तुलनेत दोन तृतियांश होता. भारत परोपकार रिपोर्ट २०२१ च्या अहवालानुसार, व्यावसायिक घराण्यांद्वारे परोपकारी कामांसाठी देण्यात आलेला निधी २०२० मध्ये तीन पटींनी वाढला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल बेन अॅण्ड कंपनी अॅण्ड डासरा यांच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.

    खासगी क्षेत्राची मदत

    अहवालातील माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२० मध्ये संपूर्ण खासगी क्षेत्राने परोपकारासाठी दिलेला निधी ६४००० कोटी रुपये होता ज्यात २० टक्के व्यावसायिक घराणे व खासगी स्तरावर करण्यात आला. या सकल परोपकारी निधीत विदेशातून प्राप्त धन, कंपन्या, किरकोळ आणी उच्च प्रतिष्ठित व्यक्ती व कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीचाही समावेश आहे. यात केवळ व्यावसायिक घराण्यांनी दिलेली देणगीच १२००० कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

    विदेशी योगदान एक चतुर्थांश

    कल्याण आणि मदतीसाठी देण्यात आलेल्या निधीत विदेशी योगदान एकूण देणगीच्या एक चतुर्थांश आहे. यात देशांतर्गत कंपन्यांचे अनुदान २८ टक्के होते. दुसरीकडे, गुंतवणूकदारांनीही यात २८ टक्के योगदान दिले आहे. अहवालानुसार, मोठ्या घराण्यांद्वारे करण्यात आलेले सेवाकार्य साथरोगाच्या काळात महत्त्वाचे सिद्ध झाले आणि गरजवंतांची मदत करायलाच हवी या भारतीय संस्कृतीचाही याद्वारे प्रत्यय आला असल्याचे अहवालात म्हटले आहे. व्यावसायिक घराण्यांनी संपूर्ण सामर्थ्यासह समाजाची मदत केली तर या कामासाठी एक मोठी रक्कमही उभी केली जाऊ शकते व भारताच्या विकासाला नवी दिशाही दिली जाऊ शकते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.